तिच्या निस्वार्थी कर्तव्यदक्षतेला जिल्हाधिकाऱ्यांचा सॅल्यूट
X
शनिवारी स्वातंत्र्य दिनाचं औचित्तसाधून तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यात कोरोना काळात आपले योगदान देणाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला पोलीस निरीक्षक अलिराणी यांचाही समावेश होता. अलिराणी यांच नाव पुकारल्यानंतर जिल्हाधिकारी कंदसामी यांनी त्यांचा सत्कार केला.
कौतुकाचे प्रमाणपत्र व शील्ड दिल्यानेचर कंदासामी यांनी अलिराणी यांना स्टेजवर बोलऊन स्वत: खाली उतरले व त्यांनी अलिराणी यांना सॅल्युट केला. अलिराणी यांनी केलेलं कामही तसचं आहे.
पोलीस निरीक्षक अलिराणी तामिनाडूच्या कोरोना प्रतिबंधात्मक टीममधे सामील आहेत. काही महिन्यांपूर्वी तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील एका गावात अमावसै नावाच्या वक्तीचा आगीत अडकून मृत्यु झाला होता. स्थानिकांनी त्या व्यक्तीचा मृतदेह घटनास्थाळावरुन बाहेर काढण्यास नकार दिला. हे पोलीस निरीक्षक अलिराणी यांना कळल्यावर त्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी स्वत: त्या मृतदेहाला बाहेर काढले.
त्या मृतदेहाला बाहेर काढताना पोलीस निरीक्षक अलिराणी
अलिराणी यांनी केलेल्या या कामाबद्दल जिल्हाधीकाऱ्यांनी त्यांच्या नावाची 'कल्पना चावला' पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचंही सांगीतलं आहे.