Home > News > गर्लफ्रेंडला गोव्यात फिरायला नेण्यासाठी त्यांनी सुरु केला दुचाकी चोरीचा धंदा

गर्लफ्रेंडला गोव्यात फिरायला नेण्यासाठी त्यांनी सुरु केला दुचाकी चोरीचा धंदा

गर्लफ्रेंडला गोव्यात फिरायला नेण्यासाठी त्यांनी सुरु केला दुचाकी चोरीचा धंदा
X

राजधानी दिल्लीच्या द्वारका पोलिसांनी अशा चोरांना अटक केली आहे, जे आपल्या गर्लफ्रेंडला फिरायला नेण्यासाठी दुचाकी चोरायचे. तर अटक केलेल्या आरोपींकडून चार चोरीच्या स्कूटी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ९ हजार 500 रुपये रोख व चोरीला गेलेला मोबाईल फोनही जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती मिळाली होती की, दिल्लीच्या महावीर एन्क्लेव्ह येथे राहणारा दीपक उर्फ ​​नोनी दादा हा देव हॉस्पिटल जवळ त्याच्या एका सहकाऱ्यासह येणार आहे. तसेच दीपिक दुचाकीचोर असल्याची सुद्धा खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला होता. दीपक स्पॉटवर पोहोचताच आधीच तयार असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. दीपकसोबत दिल्ली पोलिसांनी करण नावाच्या व्यक्तीलाही अटकही केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की, त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडला गोव्याला घेऊन जायचे आहे. त्यासाठी त्यांनी दुचाकी चोरी केल्या होत्या. तर आरोपींच्या ताब्यात असलेल्या चोरीची स्कूटी आणि दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. मात्र चोरीचे कारण आयकून पोलीसही काही वेळेसाठी आश्चर्यचकित झाले होते.

Updated : 12 Oct 2021 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top