Home > News > सुप्रीम कोर्ट ने 'ह्या' राजधर्माचं पालन केलं पाहिजे – मंत्री यशोमती ठाकूर

सुप्रीम कोर्ट ने 'ह्या' राजधर्माचं पालन केलं पाहिजे – मंत्री यशोमती ठाकूर

सुप्रीम कोर्ट ने ह्या राजधर्माचं पालन केलं पाहिजे – मंत्री यशोमती ठाकूर
X

उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे अतिशय क्रूरपणे युवतीवर अत्याचार करण्यात आला. हे प्रकरण आता स्थानिक पोलीसांकडून दडपण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचा आरोप आता अनेकांकडून होऊ लागला आहे. याचप्रकरणावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हा खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवण्याची परवानगी देऊन सुप्रिम कोर्टाने राजधर्माचे पालन केले पाहिजे.”

हाथरस बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश वर देशभरातून टीका होत आहे. पिडित कुटूंबाला माहीती न देता त्या तरुणीचा मृतदेह जाळण्यात आला होता. त्यानंतर हाथरसच्या जिल्हाधिकारी यांनी पीडित कुटूंबाला धक्कावल्याचा व्हिडिओ ही समोर आला होता. तसेच माध्यमासोबत बोलन्यास या कुटूंबाला पोलिसांनी नकार दिला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार ला नेमकं काय लपवायच असा प्रश्न देखील मंत्री ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

https://youtu.be/EMZ2b4RYoI8

Updated : 5 Oct 2020 7:57 AM GMT
Next Story
Share it
Top