Home > News > ''एकही महिला मंत्री नाही..'' अजित पवारांनी फडणवीसांना झापले

''एकही महिला मंत्री नाही..'' अजित पवारांनी फडणवीसांना झापले

एकही महिला मंत्री नाही.. अजित पवारांनी फडणवीसांना झापले
X

काल सभागृहात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्यामुळे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच झापले. मंत्रिमंडळात तुमच्यासहित २० लोक घेत असताना तुम्हाला एकाही महिलेचा घ्यावे असं वाटत नाही ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो शाहू, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचे नाव घेतो पण एकही महिलेला संधी दिली जात नाही.. , दिल्ली मध्ये तुमचे कसे संबंध आहेत आम्हाला माहित आहे. दिल्लीवरून तुम्हाला उपमुख्यमंत्री होण्याबाबत आदेश आला आणि तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत आमच्या दोन महिला देखील मंत्री करा तरच मी शपथ घेतो असं म्हंटल असतं तर झटक्यात झालं असतं असं म्हणत पवारांनी फडणवीसांवर जोरदार फटकेबाजी केली.. नक्की काय घडलं अजित पवार काय म्हणाले पहा..


Updated : 25 Aug 2022 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top