Home > News > इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात नोकरीची मोठी संधी...

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात नोकरीची मोठी संधी...

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात नोकरीची मोठी संधी...
X

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचा टायपिंगचा वेग चांगला असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मध्ये 200 पदांसाठी जागा रिक्त आहेत.

याअंतर्गत कनिष्ठ सहाय्यक टंकलेखक पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये सामील होण्यासाठी, उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) nta.ac.in आणि recruitment.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 20 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे..?

12वी उत्तीर्ण उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तथापि, याशिवाय संगणकावर इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट असा टंकलेखन वेग असावा.

पगार काय असेल?

कनिष्ठ सहाय्यक टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया - टायपिस्ट परीक्षा..

NTA द्वारे द्विभाषिक (हिंदी/इंग्रजी) मोडमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) घेतली जाईल. CBT च्या आधारे, एकूण रिक्त पदांच्या दहापट पात्र उमेदवारांची संख्या ठेवून यादी तयार केली जाईल.

टियर 1 CBT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागेल, जी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असेल.

वय मर्यादा असणार का?

भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

अर्ज करताना फी किती असणार?

भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी, सामान्य श्रेणी, OBC आणि EWS साठी 1000 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि महिलांसाठी 600 रुपये भरावे लागतील. तर, PWBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

याप्रमाणे अर्ज करा..

सर्वप्रथम recruitment.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

येथे होम पेजवर 'IGNOU Recruitment' या लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि स्वतःची नोंदणी करा.

आता अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Updated : 4 April 2023 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top