Home > News > बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (CISF) भरती, पण काय आहेत मर्यादा..

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (CISF) भरती, पण काय आहेत मर्यादा..

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (CISF) भरती, पण काय आहेत मर्यादा..
X

नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी जागा रिक्त आहेत. ज्या अंतर्गत रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिकच्या 247 पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 12 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि त्यानंतर शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.


या पदासाठी अर्ज करत असताना त्यांच्या अटी काय आहेत व कसा अर्ज करायचा सविस्तर पाहू..

शैक्षणिक पात्रता काय लागणार?

उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 60% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र, बारावीनंतर आयटीआय केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा काय असावी?

अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 12 मे 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

रिक्त जागांचा सविस्तर तपशील...

सीमा सुरक्षा दल संचालनालयाच्या अंतर्गत माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) च्या 217 पदे आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) च्या 30 पदांची भरती करायची आहे. या भरतीसाठी पुरुष उमेदवार तसेच महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया कशी असणार?

भरती प्रक्रियेत, उमेदवारांची निवड लेखी चाचणी शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.

पगार काय असेल?

भरतीमध्ये निवड झाल्यावर, उमेदवाराला पे-मॅट्रिक्स लेव्हल-3, वेतनमान रु. 25,500 ते रु. 81,100 मिळेल.

याप्रमाणे अर्ज करा..

सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर हेड कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.

फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर फायनल सबमिट बटणावर क्लिक करा.

फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Updated : 15 April 2023 2:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top