Home > News > पती पत्नी च्या भांडणात पत्नीने पेटवले घर..

पती पत्नी च्या भांडणात पत्नीने पेटवले घर..

पती पत्नी च्या भांडणात पत्नीने पेटवले घर..
X

छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे नगर परिसरात पती पत्नीच्या भांडणात विश्वास बसणार नाही, असे कृत्य घडले आहे. घटना पती-पत्नी यांच्या भांडणाची असली तरी ही भांडण घर पेटवण्या पर्यन्त गेल्याने या घटनेची सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या पती-पत्नीच्या भांडणाने घर आगीत जाळले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

छत्रपती संभाजीनगरमधून एक घटना समोर आली आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्याने संतापलेल्या पत्नीने रागाच्याभरात थेट घर पेटवलं आहे.घराला आग लावताच आगीन रौद्ररूप घेतलं. टनेनुसार, रविवारी रात्री डॉक्टर जोडप्यामध्ये काही कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा राग अनावर झाल्यामुळे पत्नीने रागाच्या भरात घराला आग लावली. आग पेटताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कठोर परिश्रम करून आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर जोडप्याची चौकशी सुरू केली आहे. अद्याप या घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे नगर परिसरात ही घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. वेळीच आगीवर नियंत्रण आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा संपूर्ण इमारत पेटण्याची शक्यता होती. सदर घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे.

पतीसोबत भांडल्यानंतर पत्नीने घर पेटवलं असल्याचा थरारक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे नगर येथे घडला असून या अद्याप पती-पत्नीच्या भांडणाचे कारण समोर आलेले नाही. या घटनेचा परिणाम डॉक्टर जोडप्याचे जीवनावर गंभीरपणे झाला आहे. घरातील सर्व सामान जळून खाक झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच, या घटनेमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावरही परिणामही होऊ शकतो.

Updated : 29 Jan 2024 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top