Home > News > ऐकावं ते नवलच, पत्नीने केलं दुसरं लग्न पती बसला उपोषणाला

ऐकावं ते नवलच, पत्नीने केलं दुसरं लग्न पती बसला उपोषणाला

ऐकावं ते नवलच, पत्नीने केलं दुसरं लग्न पती बसला उपोषणाला
X

संपूर्ण राज्यात कौटूंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना घडत असतानाच, बुलडाण्यात एक नवीनच प्रकार उघडकीस आलाय. पत्नीने पहिल्या पतीसोबत घटस्फोट न घेताच दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलंय. त्यामुळे आधीच्या पतीने आता पत्नी वर कारवाई व्हावी यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील गणेश वडोदे याचे झाडेगाव येथील संगीता हिच्याशी ९ मे २०११ रोजी लग्न झाले होते, दहा वर्षे सुखाचा संसार सुरू असतानाच त्याची पत्नी संगीता हिने २८ डिसेंबर २०२१ रोजी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले, संगीताने आधीचा पती गणेश सोबत घटस्फोटही घेतलेला नाही. याबाबत गणेश वडोदे यांनी २६ मार्च २०२२ रोजी नांदुरा पोलिस ठाण्यात पत्नी व इतर सासरकडील मंडळींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र अजूनही पोलीस कारवाई होत नसल्याने, पत्नीवर कारवाई व्हावी यासाठी गणेश वडोदे याने नांदुरा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Updated : 27 May 2022 10:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top