Home > News > ''व्यक्ती पेक्षा विचार महत्वाचा'' शिंदेच्या ट्विटची चर्चा..

''व्यक्ती पेक्षा विचार महत्वाचा'' शिंदेच्या ट्विटची चर्चा..

व्यक्ती पेक्षा विचार महत्वाचा शिंदेच्या ट्विटची चर्चा..
X

राज्यात सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्याची चर्चा राज्यातच नाही तर साऱ्या देशभर सुरु आहे. अनेकजण या राजकीय नाट्यावर आपली भूमिका अत्यंत उघड पणे मांडत आहेत. यात सिनेसृष्टीतील कलाकार देखील मागे नाहीत. सध्या एका सिने दिगदर्शकाने केलेल्या ट्विटची चर्चा आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिगदर्शक केदार शिंदे यांनी ट्विट करत ''व्यक्ती पेक्षा विचार महत्वाचा...'' असं म्हंटल आहे. शिंदे यांनी केलेले हे ट्विट राजकीय हेतूने केले आहे का? याबाबत समाज माध्यमांवर चर्चेला जोर आला आहे. केदार शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांचे राज ठाकरेंसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी सर्वानाच माहित आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली भूमिका राजकीय हेतूने केली असून उद्धव ठाकरेंना टोला असल्याचं म्हंटल जात आहे.

राज्यात मागील महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या घडामोडींवर फक्त राजकीयच नाही तर इतर क्षेत्रातील लोकांनी देखील आपली भूमिका मंडली आहे. यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील सुद्धा अनेक कलाकार आहेत. यामुळे अनेकांना ट्रॉल केलं गेलं तर अनेकांनी मांडलेल्या भूमिकेचं कौतकही झालं. दिगदर्शक केदार शिंदे यांनी जे ट्विट केले आहे त्यात म्हंटल आहे की, ''व्यक्ती पेक्षा विचार महत्वाचा!!! तो सांभाळतो, तोच खरा वारसदार!! असं ट्विट केदार शिंदे यांनी केला आहे. केदार यांच्या प्रतिक्रियेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.''

आत केदार शिंदे यांनी केलेल्या या ट्विटचा नक्की अर्थ काय? त्यांनी हे ट्विट राजकीय हेतूने केले आहे की अराजकीय? याबाबत नेटकरीच व्यक्त होत आहेत. केदार शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेक राजकीय गोष्टींवर आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचं हे ट्विट राजकीय हेतूनेच केलं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

Updated : 24 July 2022 9:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top