Home > News > 'त्या' भाजप आमदाराचा तृतीय पंथी समाजाने साडी चोळी देऊन केला निषेध

'त्या' भाजप आमदाराचा तृतीय पंथी समाजाने साडी चोळी देऊन केला निषेध

त्या भाजप आमदाराचा तृतीय पंथी समाजाने साडी चोळी देऊन केला निषेध
X

जळगाव चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या आंदोलनातील भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा निषेध जळगावातील तृतीयपंथियांनी केला आहे. कोरोना काळातमुख्यमंत्री चांगले काम करत असतांना या प्रकारचे वक्तव्य निषेधार्थ असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आमदारांना साडी-चोळीचा आहेर प्रदान केला आहे.

यावेळी बोलताना कल्याणी म्हणाल्या की, “कोरोनामुळे राज्य संकटात असताना मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. अशा वेळी मंगेश चव्हाण जे काही बोलले ते आमच्या किन्नर समाजाच्या मनाला वाईट वाटलं. म्हणूनच आम्ही ही साडी चेळी मंगेश चव्हाण यांच्यासाठी आणली आहे.” असं म्हटलं आहे.

दरम्यान, ‘मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला एक मिनीटही फुरसत नसते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे भरपूर वेळ आहे. ते मुंबई ते पुणे अडीच तासाचा प्रवास स्वत:गाडी चालवून करीत असतात. एवढा रिकामाटेकडा मुख्यमंत्री इतिहासात पहावयास मिळाला नाही.’ असं वक्तव्य मंगेश चव्हाण यांनी केलं होतं.

https://youtu.be/dcGMS6ljJYE

Updated : 7 Aug 2020 1:44 AM GMT
Next Story
Share it
Top