विषय स्वच्छतेचा... चर्चा कपड्यांची? अमृता फडणवीसांचा ट्रोलर्सना करारा जवाब! | Reply to trolls
The topic of cleanliness... the discussion about clothes? Amruta Fadnavis's befitting reply to trolls!
X
विषय सोडून, माझ्या कपड्यांची चर्चा का? हे वाईट हॅन्डल्स, यासाठी त्यांना पैसे दिले जातात : अमृता फडणवीस
मिसेस मुख्यमंत्री,म्हणजेच अमृता देवेंद्र फडणवीस या कायम चर्चेत असतात. केवळ मुख्यमंत्री यांची पत्नी नाही तर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या आवर्जून सहभाग घेत असतात. बऱ्याचदा त्यांना ट्रॉलिंगचा सामना करावा लागतो. नुकताच मुंबईमधल्या गणेश विसर्जनानंतर त्यांनी मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
या व्हिडिओमध्ये स्वतः हातात गल्व्ज घालून त्या कचरा उचलताना दिसल्या. स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभागी होताना दिसल्या. त्यान्च्यासोबतच अभिनेते अक्षय कुमार यांचीही या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती. मात्र हा मुख्य विषय सोडून त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. सोशल मीडियावर ट्रॉलर्सनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं.
आता या ट्रॉलर्स ला अमृता फडणवीस यांनी झणझणीत उत्तर दिलय.. इंडिया टुडे च्या एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं माझ्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडले आहेत जेव्हा सोशल मीडियावर लोक माझ्या बाबतीत ओव्हर रिऍक्ट होतात. अशा अनावश्यक गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात. स्वच्छता मोहीम पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा संदेश आणि समाजातील घटकांचं एकत्र येणं हा मुख्य विषय होता. पण ट्रॉलर्सनी हा विषय बाजूला ठेवून माझ्या कपड्यांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी वेगवेगळ्या अँगलने झूम करून आणि फोकस करून माझ्या कपड्यांची चर्चा सुरू केली. हे वाईट सोशल मीडिया हँडल्स खूप प्रसिद्ध आहेत *यासाठी त्यांना पैसे दिले जातात ते त्यानुसार वागतात अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिलीये. यावेळी प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी हे आवर्जून सांगितलं की "जेव्हा तुमच्या मध्ये आवाज असतो तेव्हा तुमच्या विरोधातही एक आवाज तयार होतो " मला हे ट्रॉलर्स बॅकग्राऊंड म्युझिक सारखे वाटतात तुम्ही ते कर्कश आहे असे समजून त्रास करून घ्यायचा की त्यावर नाच करत ठेका धरायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही त्यांना टाळू शकता किंवा त्यांच्या विरोधात आवाजही उठू शकतात काय करायचं हा पूर्ण निर्णय तुमचा असला पाहिजे" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
खरंय, ही गोष्ट केवळ अमृता फडणवीस यांच्या पुरती मर्यादित नाही तर आजच्या प्रत्येक स्त्री बद्दलची आहे जेव्हा एखादी स्त्री कोणतीही गोष्ट करत असते तेव्हा तिच्या विचारांपेक्षा तिच्या दिसण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. ती काय करते, ती काय आहे? यापेक्षा ती काय दिसते तिने काय परिधान केलंय याच चर्चेचा जोर दिसतो. महिलांना या चौकटीच्या बाहेर कधी बघणार आहोत आपण? अर्थात यालाच अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर अगदी रोखठोक आहे. काय घ्यायचं आणि काय टाळायचं हे आपल्या हातात आहे.