Home > News > प्रवासात मोजून चड्ड्या असल्याने चहा रद्द केला, सोशल मिडीया व्हायरल

प्रवासात मोजून चड्ड्या असल्याने चहा रद्द केला, सोशल मिडीया व्हायरल

प्रवासात मोजून चड्ड्या असल्याने चहा रद्द केला, सोशल मिडीया व्हायरल
X

अनेकांना अनेक व्यसनं असतात कुणाला दारूचं, कुणाला सिगारेटचं तर कुणाला चहाचं. आता चहाला व्यसन म्हंटल्यानंतर अनेकांना राग आला असेल हो ना..? आहो.. चहाची वेळ पाच-दहा मिनिटे इकडे तिकडे झाली तरी अनेकांचा जीव कासावीस होतो म्हणून व्यसन असं म्हंटल बाकी काही नाही. बाकी अनेकांना नुसतं चहा म्हंटल तरी तरतरी येते म्हणूनच ते म्हणतात ना चहा ला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच हे अगदी योग्य आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात एकदम फक्कड चहाने होते. आणि तिथून मग दिवसभर टप्प्याटप्प्यावर चहाचा प्रवास सुरू होतो. असा हा सर्वांना प्रिय असलेला चहा एका गोष्टीमुळे सध्या सर्वांच्या मनात धडकी भरवत आहे. अनेकांनी आपला स्वतःचा विचार करत थेट चहा घेणं रद्द केलं आहे. कारण हा चहा आहेच इतका भयंकर, मी आपल्या नेहमीच्या चहाबद्दल बोलत नाहीये. ज्या बद्दल बोलतोय तो चहा सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय आणि अनेकांना धडकी भरवतोय. नक्की असा हा कोणता चहा आहे जो चहा प्रेमींना सुद्धा डोळे उंचवायला लावतोय पाहाच...

गरम गरम वाफा येणाऱ्या चहाची मजा काही औरच असते. जे सुख अनेक पैसे खर्च करून मिळत नाही ते सुख एक कप चहात मिळतं. आता आपण हे इतकं सारं चहाचं कौतुक करतो आहे पण त्याचे वाईट परिणाम देखील तितकेच आहेत पण चहाप्रेमी या वाईट परिणामांचा विचार करतील तर मग काय बोलायचं. चहा हा आता अनेकांच्या जीवनातला खरं म्हटलं तर अविभाज्य भाग बनलाय. आता तुम्ही एकदा विचार करून बघा ना, आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपला कंटाळा दूर करणारा, आपली डोकेदुखी नाहीशी करणारा आणि टेन्शनचा नायनाट करणारा चहाच असतो. आता एक गोष्ट मात्र खरी आहे तुम्ही कितीही चहाप्रेमी असला तरी तो योग्य प्रमाणातच घेतला पाहिजे याचं भान सुद्धा चहा-प्रेमींना असलं पाहिजे जे अनेक वेळा नसतं..

आता अशा अनेक भान नसणाऱ्या चहाप्रेमींना भानावर आणणारा चहा सोशलमिडीयावर धुमाकूळ घालतोय. या चहाच नावं ऐकताच अनेकजण आपली चड्डी सांभाळण्याचा प्रयत्न करणार इतकं मात्र नक्की. आता असा हा चहा नक्की आहे तरी काय? त्याच्या नावाची इतकी दहशत का? थोडं थांबा तुम्हाला. सगळं सांगतो.. पण त्या पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आपलं फेसबुक आणि youtube चॅनेल नक्की लाईक करा.. बरं चला चहाचा विषय पहिला संपवू.. सध्या सोशल मीडियावर ज्या चहाची जोरदार चर्चा आहे त्याच कारण आहे त्या चहाच्या दुकानाला असलेलं नावं.. 'एकदम कडक चड्डिफाड चहा' असं या दुकानाचं नाव आहे. या नावाचा बोर्डचा एक फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे. चड्डिफाड चहा आता नावाचं इतकं खतरनाक आहे म्हंटल्यावर चर्चा तर होणारच ना.. एका फेसबुक वापरकर्त्याने हा फोटो शेअर करत अरे चहा घश्यात ओतायचा की चड्डीत? 🙄 प्रवासात अगदीच दिवस मोजून चड्ड्या असल्याने चहा रद्द केला…. 😆 असं म्हंटल आहे.. झालं मग त्याच्या या पोस्टवर सध्या लाइक आणि कॉमेंट्सचा पाऊस चालू आहे..

बाकी चड्डिफाड चहा विषयी तुम्हाला काय वाटतं? हे नाव ऐकताच तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्मिथहस्य आलं की नाही आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा..

Updated : 2 Jun 2023 1:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top