Home > News > एका सुंदर जासूस महिलेची कहाणी, जिच्या कामाची जगाने दखल घेतली...

एका सुंदर जासूस महिलेची कहाणी, जिच्या कामाची जगाने दखल घेतली...

एका सुंदर जासूस महिलेची कहाणी, जिच्या कामाची जगाने दखल घेतली...
X

नवी दिल्ली: सहसा जेव्हा हेरगिरीचा विषय निघतो तेव्हा पुरुषांचे नावे सर्वप्रथम समोर येतात. कारण बहुतेक लोकांना हे माहित नाही की हेरगिरीच्या जगात महिला नेहमीच पुढे राहिल्या आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका महिला जासूसची गोष्ट सांगणार आहोत, जिने तिच्या सौंदर्य आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जीवावर हेरगिरीच्या जगावर राज्य केले.

माता हारी असे या महिला गुप्तहेरचे नाव आहे, जिने आपल्या काळात हेरगिरीच्या दुनियेत पुरुषांनाही मागे टाकले होते. जगात जेव्हा-जेव्हा महिला गुप्तहेरचा उल्लेख होतो, तेव्हा तेथे माता हारीच नाव सर्वात आधी घेतले जाते. माता हारीचा जन्म 1876 साली नेदरलँड्स येथे झाला होता, परंतु पालनपोषण पॅरिसमध्ये झाला. माता हारीचा खरे नाव गेरत्रुद मार्गरेट झेले होते. ती गुप्तहेर शिवाय एक उत्तम डान्सर होती.

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने माता हारीला पैशाच्या बदल्यात माहिती पुरवण्याची ऑफर दिली होती आणि त्यामुळे ती जर्मनीची हेरगिरी बनली. त्यावेळी त्यांना दुहेरी गुप्तहेर सुद्धा मानलं जात होते.

स्पेनला जात असतांना माता हारीला इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तचर संस्थेने अटक केली. खरं तर फ्रान्स आणि ब्रिटनच्या गुप्तचर एजन्सींना असा संशय होता की, हारीला जर्मनीसाठी हेरगिरी करतेय. याचा ठोस पुरावा नसतानाही फ्रान्समध्ये हारीवर डबल एजंट असल्याचा आरोप करून तिला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

माता हारीच्या निधनानंतर तिचा मृतदेह पॅरिसमधील वैद्यकीय शाळेत ठेवण्यात आला, ज्याचा शवविच्छेदन करून प्रयोगासाठी वापरला जात होता. नंतर तिचा चेहरा अ‍ॅनाटॉमी संग्रहालयात ठेवण्यात आला होता, परंतु काही दिवसानंतर तिचा चेहरा संग्रहालयातून अचानक गायब झाला, जो आजपर्यंत सापडला नाही.

स्वत: माता हारीने कोणालाही मारले नाही, परंतु तिच्या हेरगिरीने सुमारे 50 हजार फ्रान्स सैनिक ठार मारले गेले होते. या महिला गुप्तहेरच्या आयुष्यावर १९३१ मध्ये एक हॉलिवूड चित्रपट बनवला गेला, ज्यामध्ये ग्रेटा गर्बो मुख्य भूमिकेत होती.

Updated : 11 July 2021 4:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top