Home > News > कोरोनाचा विसर; हजारो महिलांच्या उपस्थित काढली कलश यात्रा

कोरोनाचा विसर; हजारो महिलांच्या उपस्थित काढली कलश यात्रा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत २३ जणांना केली अटक

कोरोनाचा विसर; हजारो महिलांच्या उपस्थित काढली कलश यात्रा
X

देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना,अजूनही नागरिक गांभीर्याने वागत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील नवापुरा-निधराड गावातील हजारो महिला व पुरुषांनी एकत्र येत बलियादेव मंदिरातून कलश यात्रा काढली.

विशेष म्हणजे ही यात्रा पोलिसांच्या बंदोबस्तात काढण्यात आली होती. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत २३ जणांना अटक केली आहे.

गुजरातमध्ये आतापर्यंत एकूण 6 लाख 33 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 7 हजार 912 जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला गुजरातमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. मात्र असे असतानाही आशा प्रकारे हजारोंच्या संख्येने धार्मिक कार्यक्रम पार पडत असल्याने,कोरोना कसा रोखायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Updated : 7 May 2021 5:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top