Home > News > मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा केला विनयभंग, पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा केला विनयभंग, पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा केला विनयभंग, पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल
X

गुरु आणि शिष्याचे नाते अतिशय पवित्र मानले जाते, मात्र गेल्या काही दिवसांपासून याच पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. पुन्हा अशीच एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली असून, मुख्याध्यापकाने आपल्या पाचवीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले आहेत, विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून या वासनांद मुख्याध्यापकावर पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तर आरोपी मास्तर सध्या फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदुरा तालुक्यातील मुरंबा येथे जिल्हा परिषद शाळेवर देविदास डिगोळे हा मुख्याध्यापक आहे, त्याने आपल्याच शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला मुख्याध्यापक कक्षात बोलावून शिक्षेच्या नावाखाली तिच्या शरीरावरून वाईट उद्देशाने हात फिरवत अश्लील चाळे केले, आणि हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

मात्र घरी जाऊन या विद्यार्थिनीने हा संपूर्ण प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी तात्काळ पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, या तक्रारीवरून आरोपी मुख्याध्यापक देविदास डीगोळे याच्यावर पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी मुख्याध्यापक फरार झाले होते त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे. अलीकडच्या काळामध्ये काही शिक्षकांची नीतिमत्ता ढासळत असून, बुलढाणा जिल्ह्यात एका महिन्यातली ही तिसरी घटना आहे. यामुळे आपल्या मुलींच्या सुरक्षितते संदर्भात पालकांमध्ये आता चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.


Updated : 8 Sep 2022 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top