Home > News > फक्त चपलेवरून पोलिसांनी महिलेच्या हत्येचं गुढ उकललं.

फक्त चपलेवरून पोलिसांनी महिलेच्या हत्येचं गुढ उकललं.

फक्त चपलेवरून पोलिसांनी महिलेच्या हत्येचं गुढ उकललं.
X

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये सुप्रिया शिंदे या महिलेची गळा दाबून तिच्या राहत्या घरीच हत्या करण्यात आली होती. पोलिस या प्रकरणात तपोस करत असताना चप्पलेची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यावरून आरोपीचा माग काढला आणि त्याला अटक केली.

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमधील दावडी परिसरात एका इमारतीमध्ये सुप्रिया शिंदे या महिलेचा मृतदेह तिच्याच घरातील सोफा सेट मध्ये आढळला होता. पोलिस तपासात सुप्रिया हिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला मात्र काहीच सुगावा लागत नसल्याने आरोपी शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. तपासा दरम्यान साक्षीदारांनी हत्येच्या वेळी सुप्रिया यांच्या घराबाहेर चपला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही चप्पल कुणाची हे शोधून काढत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशाल घावट असं या आरोपीचे नाव असून विशाल हा शिंदे यांचा शेजारी आहे. पुस्तक देण्याच्या बहाण्याने तो घरात शिरला आमि त्याने सुप्रियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया ने प्रतिकार करताच त्या दरम्यान विशाल ने तिची गळा दाबून हत्या केली.

डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी इमारती मध्ये कीशोर शिंदे त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे आपल्या मुलासह राहत होते .15 फेब्रुवारी रोजी किशोर शिंदे सकाळी कामावर गेले सायंकाळी घरी परतले तेव्हा त्यांची पत्नी सुप्रिया घरी नव्हती .त्यांनी तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे विचारपूस केली मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्रीच्या सूमारास किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेले याच दरम्यान घरी असलेल्या नातेवाईकाना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफा सेट मध्ये आढळून आला .त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.सुप्रिया हिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कोणताही सुगावा नसल्याने हत्या का व कुणी केली, आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकलं होतं. तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचा पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चपल कोणती हे निष्पन्न केलं. अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल गावडे याची चप्पल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलीस खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली . 15 फेब्रुवारी रोजी त्यावेळी दुपारी सुप्रिया यांचा मुलगा शाळेत गेला होता व पती कामावर निघून गेले होते.सुप्रियाला वाचनाची आवड असल्याने विशाल पुस्तक देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला सुप्रिया घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुप्रियाने त्याला प्रतिकार केला यावेळी विशालने सुप्रियाचे डोके फरशीवर आपटलं त्यानंतर टायने गळा आवळून तिला जिवे ठार मारले व तिचा मृतदेह त्याच्या घरातील सोफासेट मध्ये लपवून ठेवला. धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्याने किशोर हे मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले .त्या वेळेला विशाल हा देखील त्यांच्यासोबत गेला होता .पोलिसांनी या प्रकरणात काहीही सुगावा नसताना फक्त चपले वरून आरोपी शोधण्यात मानपाडा पोलिसांना यश आले .या इमारतीतील व आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचा देखील आवाहन केलं.

Updated : 18 Feb 2022 9:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top