Home > News > फिजिओथेरपी शिकवण्याच्या बहाण्याने फिजिओथेरपिस्ट ने केला नर्सचा विनयभंग

फिजिओथेरपी शिकवण्याच्या बहाण्याने फिजिओथेरपिस्ट ने केला नर्सचा विनयभंग

फिजिओथेरपी शिकवण्याच्या बहाण्याने फिजिओथेरपिस्ट ने केला नर्सचा विनयभंग
X

मरावती शहरातील राजापेठ परिसरात पारवानी हॉस्पिटल मध्ये आशीष चौधरी या फिजिओथेरपिस्ट ने फिजिओथेरेपी शिकवतो या बहाण्याने नव्यानेच रूजू झालेल्या नर्स सोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर लगेचच नर्सने तात्काळ नजीकचे राजापेठ पोलिस स्टेशन गाठले व त्याची तक्रार केली.

त्यानंतर ही घटना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच युवा सेनेचे शहर प्रमुख राहुल माटोडे व त्यांचे कार्यकर्ते त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले व एकच राडा केला, हॉस्पिटलमध्ये हा फिजिओथेरपिस्ट नकोच असे म्हणत फिजिओथेरपिस्ट आशीष चौधरी यांचे हॉस्पिटल मधील बोर्ड फाडत त्यांच्या डिग्रीचे सर्व बोर्ड फोडले, त्यानंतर राजापेठ पोलिसांनी आरोपी अशी चौधरी याला अटक केली व त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

Updated : 25 May 2022 2:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top