Home > News > प्रेम संबंध मान्य नव्हते म्हणून पोटच्या पोरीचा गळा दाबून हत्या...

प्रेम संबंध मान्य नव्हते म्हणून पोटच्या पोरीचा गळा दाबून हत्या...

प्रेम संबंध मान्य नव्हते म्हणून पोटच्या पोरीचा गळा दाबून हत्या...
X

नांदेड जिल्ह्यात काल अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. आई-वडिलांनीच आपल्या 23 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. हा खून करण्याचे कारण होते मुलीचे तरुणासोबत असलेले प्रेमसंबंध. तिने प्रेम केलं म्हणून घरच्यांनी २३ वर्षीय शुभांगीचा रुमालाने गळा दाबून खून केला. तिचं नात्यातीलच एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. ज्यावेळी हे प्रेम संबंध घरच्यांना समजले त्यावेळी त्यांना ते मान्य झाले नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी व नातलगांनी मिळून शुभांगीचाच काटा काढण्याचे ठरवले. मुलीला दुसऱ्या कोणासोबत विवाह करणे मान्य नव्हतं, तरीदेखील घरच्यांनी दुसऱ्या मुलासोबत तिचा साखरपुडा केला. या लग्नाला विरोध करत तिने लग्न मोडण्यासाठी पुढाकार घेतला आणि ती सोयरीक मोडून काढली.

बदनामी होईल म्हणून आई-वडिलांनी मुलीचा केला खून..

सोयरीक मोडल्यामुळे शुभांगीच्या घरच्यांना राग अनावर झाला. गावात आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी तिला संपवण्याचा कट रचला आणि 22 जानेवारी दिवशी आई-वडिलांनी व नातलगांनी गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचं प्रेत रात्री उशिरा शेतात नेण्यात आले. इतकाच नाही तर शेतात सरण रचून प्रेत जाळले देखील गेले. इतकं सगळं झाल्या नंतर हा सगळा प्रकार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून, ज्या ठिकाणी प्रेत जाळण्यात आलं होतं त्या ठिकाणी नांगर फिरवण्यात आला. तिच्या हत्येचे सर्व पुरावे नष्ट करण्याचा घरच्यांनी प्रयत्न केला. पण गावातीलच कोणीतरी आपलं नाव न सांगता पोलीस ठाण्यात फोन केला आणि या सगळ्या घटनेची माहिती दिली. यानंतर शुभांगीच्या हत्येचं सत्य जगासमोर आलं.

खून केला नसल्याचं दाखवून देण्यासाठी रचला होता प्लॅन...

डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करणाऱ्या या तरुणीची आपल्या आई-वडिलांनी हत्या केली. शुभांगीचा खून केल्यानंतर तिचे आई-वडील व नातलग जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीने वावरत होते. कोणाच्याही चेहऱ्यावर मुलीची हत्या केल्याचं भय नव्हतं. शुभांगीची हत्या लपवण्यासाठी या सर्वांनी मिळून तिचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा मोठा बनाव रचला होता. आता पोलीस या घटनेचा अधिक तपस करत आहेत.

पोलिसांनी वडील व नातलगांना ताब्यात घेतले आहे..

ही सगळी घटना पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्धन जोगदंड, तिचा भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, गोविंद जोगदंड, आणि मामा केशव कदम आशा पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Updated : 28 Jan 2023 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top