Home > News > मोबाइल चोरीच्या संशयावरून जमावाने अल्पवयीन मुलाला बांधून विजेचे शॉक दिले

मोबाइल चोरीच्या संशयावरून जमावाने अल्पवयीन मुलाला बांधून विजेचे शॉक दिले

मोबाइल चोरीच्या संशयावरून जमावाने अल्पवयीन मुलाला बांधून विजेचे शॉक दिले
X

बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे जमावाने एका निष्पाप मुलाला पकडून त्याला विजेचा शॉक दिले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे. मोतीपूर पोलीस स्टेशन परिसरातील साधा गावात गुरुवारी एका अल्पवयीन मुलाला मोबाइल चोरीच्या आरोपावरून जमावाने पकडले. त्यापैकी एकाने मुलाला दोरीने बांधून इलेक्ट्रिक शॉक दिले.

घटनेची माहिती मिळताच मोतीपूर पोलिसांनी मुलाला सुरक्षित गर्दीतून बाहेर काढले आणि त्याच्यावर उपचार केले. पीडित मुलगा आता पूर्णपणे बरा झाला असून, त्याला आता कुटुंबातील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आले.

तर या घटनेसंदर्भात, पीडित अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलावर काही लोकांकडून अत्याचार केल्याची तक्रारही पोलिसात केली आहे, त्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र एका लहान मुलाला बांधून शॉक दिल्याच्या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध केला जात आहे.

Updated : 25 Sep 2021 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top