Latest News
Home > News > नागपूर हादरले, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोनवेळा ऑटोचालक आणि कुलींनी केला सामुहिक बलात्कार

नागपूर हादरले, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोनवेळा ऑटोचालक आणि कुलींनी केला सामुहिक बलात्कार

नागपूर हादरले, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोनवेळा ऑटोचालक आणि कुलींनी केला सामुहिक बलात्कार
X

पुन्हा एकदा राज्याची उपराजधानी सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीवर ऑटोचालक आणि कुलींनी सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गुरूवारी घरातून निघून नागपूर रेल्वेस्थानकावर आली होती, मात्र एकट्या मुलीला पाहून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.

रेल्वेस्थानकावर आलेल्या पिडीत अल्पवयीन मुलीकडे पुरेसे पैसे नसल्याने ती रेल्वेने जाऊ शकली नाही. त्याच वेळी ऑॅटोचालक मोहंमद शहानवाज उर्फ साना वल्द मोहंमद रशीद याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीवर नेले. तिथे अन्य एक ऑटोचालक मित्र मोहंमद तौसीफ वल्द मो. युसूफ व मोहंमद मुशीर याच्यासह आणखी एकाला बोलावून घेतले.

या चौघांपैकी दोघांनी गुरूवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी मेयो चौकातील मेट्रो उड्डाणपुलाखाली ऑॅटोत बलात्कार करून शुक्रवारी पहाटे तिला मेयो रूग्णालया जवळ सोडून दिले. या घटनेने खळबळ उडाली असून, घटनेनंतर पुन्हा एकदा नागपूर शहर चर्चेत आले आहे.

Updated : 2 Aug 2021 4:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top