Home > News > फक्त शाळाच का बंद? मेस्टा संघटनेचा वर्धा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय

फक्त शाळाच का बंद? मेस्टा संघटनेचा वर्धा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय

फक्त शाळाच का बंद? मेस्टा संघटनेचा वर्धा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय
X

इंग्रजी माध्यमाच्या शाळा संस्थाचालकांची संघटना मेस्टाने त्यांच्या सभासद असलेल्या जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग 27 सप्टेंबरपासून नियमित सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .

महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात मार्केट ,बस, ट्रॅव्हल्स, कोचिंग क्लासेस, रेल्वे , धार्मिक उत्सव, लग्न सोहळे ,राजकीय कार्यक्रम धूम धडाक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यात परिवारासोबत सर्व मुलांचा समावेश असतो,असे असताना फक्त शाळाच का बंद? असा सवाल उपस्थित करत वर्धा जिल्ह्यातील पालकांनी शाळा सुरू व्हाव्यात यासाठी शाळेत भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. आपले पाल्य शाळाबाह्य असल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

त्यातच वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भावी पिढी शिक्षण घेऊन सक्षम व संस्कारशील व्हावी या उदात्त हेतूने कोरोना महामारीचे आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही नियम अटी आहे त्याचे पालन करून जिल्ह्यात वर्ग 5 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेने घेतला आहे. आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी सर्व पालकांनी कोरोनाच्या नियम ,शर्ती पाळून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे असे आवाहन मेस्टा संघटनेचे जिल्हा सचिव मोहन राईकवार यांनी केले आहे.

Updated : 22 Sep 2021 2:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top