Home > News > ..आणि तिला केसातील जटेतून मुक्तता मिळाली

..आणि तिला केसातील जटेतून मुक्तता मिळाली

वडील शास्त्रज्ञ, नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर, मोठी बहीण अमेरिकेत वास्तव्यास असं सगळं घरचं सुशिक्षित वातावरण असताना फक्त केसात निर्माण झालेल्या जटेमुळे एका महिलेवर काय परिस्थिती ओढवली आणि त्यांना या अंधश्रद्धेचा कसा सामना करावा लागला याचा मनात चीड निर्माण करणारा प्रसंग सामाजिक कार्यकर्त्यांनी नंदिनी जाधव यांनी शेअर केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या महिलेच्या केसात झालेल्या जटा काढून टाकत 251 व्या महिलेला जटेतून मुक्त केले आहे..

..आणि तिला केसातील जटेतून मुक्तता मिळाली
X

पुण्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या या महिला यांनी स्वतःचे नाव न सांगण्याची विनंती केल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही

या ताईंचे शिक्षण Bsc झाले असून वय वर्षे 55. त्यांचे वडील शास्त्रज्ञ होते.गेल्या दीड वर्षापासून डोक्यातील केसात जट तयार झाली होती.आईची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांची सेवा करण्यातच संपूर्ण वेळ जात असत तेव्हा स्वतःकडे लक्ष देता आले नाही.आईचे निधनानंतरही डोक्यात वाढत असलेल्या जटेकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे संपूर्ण केसात गुंता वाढत गेला त्यामुळे शारीरिक मानसिक त्रास सुरू झाला डोक्यात जट असल्यामुळे बाहेर ही जात नसत. गेल्यास तर डोक्याला ओढणीच्या साह्याने झाकून त्या बाहेर जात पण डोक्यातील जट कोणाला दिसली तर लोक काही म्हणतील या भीतीने त्या बाहेर जाण्याचे ही टाळत असत. घरातील सर्व लोकांनी जट काढून टाकण्याची विनंती केली. गेली सात महिने या जटेला पाणी, कंगवा काहीच लावले नव्हते.अस्वच्छतेमुळे त्यांचा कुबट वास संपूर्ण घरात येत होता. घरातील लोकांच्या सांगण्यावरून त्या जवळच असणाऱ्या ब्युटी पार्लर मध्ये गेल्या असता त्या पार्लरमध्ये जट काढण्यास आमच्याकडे साहीत्य नाही आम्हांला ते कापताही येणार नाही.आम्हांला जट कापण्याचा अनुभव नाही असै सांगितले गेले.पार्लरमध्येही जट कापली जात नाही म्हटल्यावर त्या नाराज झाल्या. तेव्हा घरी आल्यानंतर त्यांनी गुगलला जट निर्मूलन विषयी सर्च केले असता. चार दिवसापूर्वी पेपरला आलेल्या जट निर्मूलन संदर्भात बातमी वाचण्यात आली पण त्यामध्ये संपर्क नं. नसल्यामुळे त्यांनी गुगुलवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्य मिलिंद देशमुख सरांचा मो.नं. मिळाला. त्यांचेकड्न माझा मो.नं. घेवून माझ्याशी संपर्क केला.

गेली तीन दिवस सतत मी त्यांना फोनद्वारे संपर्क करत होते.त्यांना समुपदेशन करत होते. त्यांची एकच इच्छा होती. माझे नांव, फोटो कुठे येता कामा नये. मी तुमच्या ऑफीसमध्ये येणार नाही. तेव्हा मी तुमच्या घरी येते असे सांगितले. माझ्या बरोबर दोन कार्यकर्ते सोबत असतील असे सांगताच. त्यांनी त्यास नकार दिला. तुम्ही एकटेच या..... या मतावर त्या ठामच होत्या. तोपर्यत त्यांनी मला काही त्यांचा राहत्या घराचा पत्ता काही दिला नाही. त्यांना खुप समजावून सांगितले आता पर्यत मी केलेल्या जट निर्मूलनाचे फोटो, नांव अर्जासह रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले आहे. त्यामुळे मला तुमचा चेहरा न दाखवता फक्त जटेचा फोटो घेते. हे समजावून सांगितल्या नंतर त्या चार दिवसांनी जट काढावयासतयार झाल्या . पण अट मात्र एक होती सोबत बरोबर कोणाला आणायचे नाही. मी ही ते मान्य केले.कारण त्या ताईची जटेतुन मुक्तता करणे माझ्यासाठी महत्वाचे होते. काही अटीवर त्यांनी मला त्यांचा घरचा ऍड्रेस दिला.

आज रोजी त्यांच्या घरी जावून जवळजवळ दोन तास प्रथम त्यांच्याशी त्यांच्या पती, मुला सोबत गप्पा मारल्या. जटेसंदर्भात संपूर्ण माहीती सांगितली. आम्ही सुशिक्षित आहोत.वडील सायंटिस्ट होते. आई ही शिकलेली जॉब करत होती. आम्ही दोघी बहिणी,मोठी बहीण सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. पती सॉफ्टवेअर इंजिनियर तसेच मुलगा बारावी असे सुशिक्षित आणि सदन कुटुंब पण गेल्या दीड वर्षे डोक्यातील जटेमुळे त्यांच्या शरीरावर तसेच मनावर झालेला परिणाम जाणवत होता. रीतसर त्यांच्याकडून अर्ज लिहून घेवून जट काढून टाकण्यात आली.जट काढल्यानंतर त्या ताईना तसेच पती व मुलाला खुप आनंद झाला.

जट कापल्यानंतर ताईनी दिलेल्या प्रतिक्रिया खुप छान होत्या.अडचणींच्या वेळी मदत करणार्‍या माणसातच देव असतो.आज मी तुमच्यात देव पाहीला.लोकांना पैसे देवुनही हे काम करत नाही पण तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून काम करता.माझा चेहरा ,नांव न टाकता माहीती शेअर करण्याची परवानगीही दिली.जट काढल्यामुळे खुप हलके वाटते. सर्वानी आभार मानले.गेली कित्येक दिवस हे कुटुंब जटे पायी तणावाखाली होते.पण आज सर्वाच्या चेहर्‍यावर आनंद होता.मलाही खूप छान वाटत होते.माझ्यासाठी या ताईची जटेतुन मुक्तता करणे महत्वाचे होते.

लोक कितीही शिकलेले असले तरी अशा छोट्या छोट्या अंधश्रध्देत स्वत:ला अडकवून ठेवतात. त्यात त्यांना समाजाचीही भिती पण असते. लोक काय म्हणतील या भीतीने लोकांसमोर जायचे नाही. स्वतः बरोबर संपूर्ण कुटुंबही यात भरकटले जाते.त्यामुळे सर्वाच्याच मानसिकतेवर याचा परिणाम होतो. वेळीच विचार करणे गरजेचे आहे.अंधश्रध्देपोटी अशा अनेक छोट्याछोट्या गोष्टी घडत असतात.पण समाज काय म्हणतील या भीतीने ते आतल्या आत कुढत राहतात.त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.त्या अडचणीतुन मुक्त करण्यासाधी आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते वेळोवेळी आपल्या मनात असणार्‍या शंकेचे निरसन करण्यासाठी तयार असतात...

नंदिनी जाधव

महा.अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य

9422305929

Updated : 5 Aug 2022 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top