Home > News > अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार; महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार; महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार; महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची ग्वाही
X

राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे राज्यसेवा आयोगात किती उमेदवारांना अपात्र व्हावे लागले आहे?, हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे त्वरित विनंती करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. यासंदर्भात अनाथ विद्यार्थ्यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.

अनाथ आरक्षणामध्ये 'अ' वर्ग प्रमाणपत्र मधील ज्यांचे नातेवाईक नाहीत आणि ज्यांच्या जातीचा उल्लेख नाही अशांचा समावेश आहे. प्रमाणपत्र 'ब' मध्ये ज्यांचे नातेवाईक नाहीत मात्र त्यांच्या जातीचा उल्लेख आहे आणि ज्यांचा सांभाळ संस्थेने केला आहे अशांचा समावेश आहे. तर प्रमाणपत्र 'क' दर्जामध्ये ज्यांचे आई-वडील नाहीत मात्र नातेवाईकांनी सांभाळ केला आहे अशा अनाथ बालकांचा समावेश होतो. यापैकी 'अ' आणि 'ब' यांना राज्यसेवा आयोगाने पात्र ठरवले असले तरी 'क' दर्जा असलेल्यांना मात्र पात्र ठरवले नाही आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे.

त्यामुळे, 'क' दर्जा असलेल्या उमेदवारांना अनाथ प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांना भविष्यासाठी नोकरीत संधी मिळावी यासाठी शासन निर्णयामध्ये बदल करण्याची गरज असून, अशा पद्धतीचा प्रस्ताव महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून दिल्याचा यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच या संदर्भामध्ये नवीन निर्णय जाहीर करण्यात येऊन अशा अनाथ विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा नोकरीचा प्रश्न संपुष्टात येऊन त्यांना संधी निर्माण होणार आहे.

Updated : 30 July 2021 5:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top