Home > News > एकतर्फी प्रेमाचा कहर; लग्नास नकार देण्याऱ्या शिक्षिकेला लोखंडी सळईने मारहाण...!

एकतर्फी प्रेमाचा कहर; लग्नास नकार देण्याऱ्या शिक्षिकेला लोखंडी सळईने मारहाण...!

एकतर्फी प्रेमाचा कहर; लग्नास नकार देण्याऱ्या शिक्षिकेला लोखंडी सळईने मारहाण...!
X

राज्यात अलीकडे प्रेमप्रकरणातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, प्रेयसीला लग्नासाठी मागणी घालत तिच्यावर तबाव आणणे आणि जर तिच्याकडून याला विरोध झाला तर गुन्हेगारी प्रवृत्तीने तिच्यावर अन्याय करणे अशा घटना आपण नेहमी ऐकत असतो, अशीच काहीशी घटना मुंबईतल्या मालाड परिसरात घडली आहे.

नेमकं काय घडलंय ?

लग्नास नकार देणाऱ्या एका शिक्षिकेला लोखंडी सळईने मारहाण केल्याची संतापजनक घटना मुंबईतल्या मालाड परिसरात घडली आहे. ही घटना कुरार पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून या प्रकरणी कुरार पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस यंत्रणेकडून त्याचा तपास सुरू आहे. या मारहाणी दरम्यान पिडीत शिक्षिकेच्या डोक्याला, डाव्या पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मारहाण करणारा आरोपी कोण आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमन ऊर्फ मोहम्मद हाऊन इद्रीस असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पिडीत शिक्षिका ही मालाड पूर्व परिसरात राहत असून आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. या एकतर्फी प्रेमातूनच त्याने तिच्याकडे लग्नासाठी मागणी घातली असता तिनं विरोध केला. या गोष्टीने त्याला राग आला आणि त्याने रागाच्या भरात तिच्यावर लोखंडी सळईने मारहाण करत तिला गंभीर जखमी केले आहे. यानंतर त्याच्याविरोधात कुरार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्याचा तपास सूरू आहे.

Updated : 2 April 2024 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top