Home > News > नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
X

सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त व माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

नीला सत्यनारायण या एक कर्तव्यदक्ष अधिकारी, संवेदनशील लेखिका, धीरोदात्त माता व चिंतनशील व्यक्ती होत्या. शासकीय सेवेतील तसेच जीवनातील प्रत्येक भूमिका त्या सकारात्मकतेने समरसून जगल्या. त्यांच्या निधनामुळे आपण एक उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक जाणीव असलेले व्यक्तित्व गमावले आहे. नीला सत्यनारायण यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Updated : 16 July 2020 9:18 AM GMT
Next Story
Share it
Top