Home > News > मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न; नंतर गर्भधारणा, पोलिसांना कळताच....

मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न; नंतर गर्भधारणा, पोलिसांना कळताच....

मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न; नंतर गर्भधारणा, पोलिसांना कळताच....
X

आई-वडिलांनीच एका 14 वर्षीय मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ही घटना आहे. विशेष म्हणजे आजारी असल्याने उपचारासाठी मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगी गर्भवती गर्भवती असल्याचं सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

सरकार बालविवाह रोखण्यासाठी मोठं प्रयत्न करतायत, मात्र असं असतानाही काही लोकं अजूनही बालविवाहबाबत जागृत झाले नसल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात 2020 साली अल्पवयीन मुलीचे तिच्याच आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच तिला गर्भधारणा झाली.

मुलीची तब्येत खराब झाल्यानंतर तिला उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी मुलगी अल्पवयीन असून ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यांनतर डॉक्टरांनी सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मुलीचे आई-वडील, पती आणि सासू-सासरे यांच्याविरोधात अत्याचार, पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 2 Aug 2021 4:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top