Home > News > सासरी नांदायला नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला बापानेच नदीत ढकललं 

सासरी नांदायला नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला बापानेच नदीत ढकललं 

पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत संशयित वडिलाला ताब्यात घेतले असून, कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सासरी नांदायला नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला बापानेच नदीत ढकललं 
X

मुलगी अल्पवयीन असतानाही बापाने तिचा विवाह जबरदस्ती लावून दिला आणि त्यांनतर मुलगी सासरी नांदायला नकार देत असल्याने तिला बापानेच नदीत ढकलून दिल्याची संतापजनक घटना कोल्हापूरमध्ये समोर आली आहे. जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. तर चार दिवसांपूर्वी पित्यानेच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. आता मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळला आहे.

चार दिवसांपूर्वी वडिलाने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिल्याने, पोलीस तिचा शोध घेत होते. गेली तीन-चार दिवसांच्या शोधानंतर सुद्धा मुलगी आढळून येत नसल्याने पोलीस सुद्धा हतबल झाले होते. अशात मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळला आहे. मात्र मुलीला ढकलून दिल्याचा संशय पोलिसांना आला.

त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत संशयित वडिलाला ताब्यात घेतले. त्यांनतर मुलगी सासरी नांदायला नकार दिल्याने बापानेच तिला नदीत ढकलून जीवे मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बापाला अटक केली आहे.तसेच कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Updated : 17 Aug 2021 5:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top