Home > News > नरबळी नव्हे तर जन्मदात्या बापानंच केला मुलाचा खून; पोलिसांनी मूळ प्रकार उघडकीस आणला

नरबळी नव्हे तर जन्मदात्या बापानंच केला मुलाचा खून; पोलिसांनी मूळ प्रकार उघडकीस आणला

नरबळी नव्हे तर जन्मदात्या बापानंच केला मुलाचा खून; पोलिसांनी मूळ प्रकार उघडकीस आणला
X

कोल्हापुरात काल एक घटना घडली आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात कापसी या गावात दोन दिवसांपूर्वी एका बालकाचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहावर हळदी-कुंकू असल्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त होत होता. पण पोलिसांच्या प्राथमिक तपासातून मात्र काही वेगळेच चित्र समोर आले आहे. मुलाच्या बापानेच रागाच्या भरात त्या बालकाचा बळी घेतला आणि त्यानंतर हा नरबळीचा प्रकार असल्याचा दिखावा केला.

आरव केसरे असे या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील राकेश केसरे व त्यांच्या पत्नी या दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. सोमवारी दुपारी या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पत्नी बाहेर गेले. वडील राकेश यांनी आईला बोलावून आण असं आरवला सांगितले. त्यावेळी त्याने नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात राकेशने हातातील हातोडा आरावला फेकून मारला. हातोडा जोरात लागल्यामुळे आरव जागीच बेशुद्ध पडला. हा प्रकार सर्वांना समजेल आणि आपले पितळ उघडे पडेल म्हणून राकेशने आरवाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह लपून ठेवला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी हळद-कुंकू टाकून नरबळी असल्याचा दावा केला.



त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात जन्मदात्या बापानेच खून केल्याचे उघडकीस आले. आपल्या मुलाच्या खुनाची कबुली वडील राकेश यांनी दिली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करत आहेत.

Updated : 7 Oct 2021 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top