Home > News > ऐकावे ते नवलच! कुटूंबाने चिमुकलीची घोड्यावरून मिरवणूक काढत साजरा केला वाढदिवस

ऐकावे ते नवलच! कुटूंबाने चिमुकलीची घोड्यावरून मिरवणूक काढत साजरा केला वाढदिवस

ऐकावे ते नवलच! कुटूंबाने चिमुकलीची घोड्यावरून मिरवणूक काढत साजरा केला वाढदिवस

ऐकावे ते नवलच! कुटूंबाने चिमुकलीची घोड्यावरून मिरवणूक काढत साजरा केला वाढदिवस
X

गेल्या काही वर्षांत राज्यात मुलींचं घरोघरी स्वागत होत असल्याचंदिसून येत आहे. घरोघरी नवजात बालिकांचं मोठ्या थाटात स्वागत केलं जातंय. अनाडी या हिंदी सिनेमामध्ये ज्यापध्दतीने तीन भाऊ वाजत गाजत आपल्या बहिणीचा वाडदिवस साजरा करतात त्याचप्रमाणे एका कुटूंबानं वर्ध्यामध्ये आपल्या लहान मुलीचा वाढदिवस तिची घोड्यावरून मिरवणूक काढत साजरा केला.

वर्धा जील्हातील अल्लिपूर येथिल डफ कुटुंबीयांनी 'गोड मुलगी गोडुली, आम्हा घरी आली दिवाळी' असे म्हणत मुलीच्या पाचव्या जन्मदिनी घोड्यावरून मुलीची मिरवणूक काढली. ही मिरवणूक काढून स्त्री शक्तीचा सन्मान करून समाजासमोर डप कुटूंबाने एक आदर्श निर्माण केलाय. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाने अनेकांना मुलीचा असाही वाढदिवस होऊ शकतो हे कळले. आज मुली प्रत्येक क्षेत्रात मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. केवळ कामच नाही तर अनेक क्षेत्रात त्या आघाडीवरच आहेत.


यातून मुलांप्रमाणे मुलींच्या ढोल ताश्याच्या गजरात, तुतारीच्या निनादात भव्यदिव्य राजेशाही थाटात पांढऱ्या शुभ घोड्यावर कु. तीर्था हीची मिरवणूक काढत या कुटूंबाने तिचा वाढदिवस साजरा केला. तिला या वेळी झाशीच्या राणीची वेशभुषा करून झाशीच्या राणीचा सन्मान दिला. आज आपल्या मुलीला असा मान देण्याची देण्याची जबाबदारी प्रत्येक पित्याची आहे. साडिचोळी नेसून हाती खेळण्यातील तलवार घेऊन घोड्यावर स्वार झाली. हा आनंदमयी स्त्री सुवर्ण सोहळा सर्व सख्ख्या सोयऱ्यासह साजरा करण्यात आला. नाचत, गाजत निघालेली ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. गावकऱ्यांनी हा सोहळा हा वेगळा अनुभवला. डफ परिवाराने केलेला हा सोहळा खरोखरच गावात आदर्श ठरला.

Updated : 27 April 2022 6:35 AM GMT
Next Story
Share it
Top