Home > News > नवाजुद्दीन आणि आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद सुटला... आलिया म्हणाली

नवाजुद्दीन आणि आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद सुटला... आलिया म्हणाली

नवाजुद्दीन आणि आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद सुटला... आलिया म्हणाली
X

गेल्या वर्षी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद चर्चेत होते. आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता दोघांनीही मतभेद मिटवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

आलियाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये नवाजुद्दीन, ती आणि त्यांची मुलं दिसत आहेत. तिने या फोटोला "लग्नाचा १४ वा वाढदिवस" असं कॅप्शन दिलं आहे.

आलियाने सांगितलं की नवाजुद्दीन तिला आणि मुलांना भेटायला दुबईला आला होता. "आमच्या आयुष्यात अलीकडे काही बदल घडून आले आहेत. वाईट गोष्टी जगाबरोबर शेअर करताना चांगल्या गोष्टीही शेअर करणं गरजेचं आहे. नवाज इथे होता, त्यामुळे आम्ही मुलांसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला," असं ती म्हणाली.

डिसेंबर २०२३ मध्ये नवाजुद्दीन दुबईत होता आणि त्यांनी सर्वांनी एकत्र नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं.

आलिया पुढे म्हणाली, "आमच्या नात्यातील समस्यांमागे नेहमीच तिसऱ्या व्यक्तीचा हात होता. पण आता सगळे गैरसमज दूर झाले आहेत. मुलांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आयुष्यात वेगळे राहण्याचा पर्याय नाही, कारण मुलंही मोठी होत आहेत. आमची मुलगी शोरा तिच्या बाबांच्या खूप जवळ आहे आणि या वादाबाबत ती नाराज होती. त्यामुळे आम्ही न भांडता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला."

नवाजुद्दीन पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवून मुंबईला परतला आहे. तर मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने आलिया लवकरच भारतात येणार आहे.

Updated : 28 March 2024 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top