Home > News > Viral Video : नवरीचा 'पप्पू कॅन्ट डान्स' या गाण्यावर अफलातून डान्स...

Viral Video : नवरीचा 'पप्पू कॅन्ट डान्स' या गाण्यावर अफलातून डान्स...

Viral Video : नवरीचा पप्पू कॅन्ट डान्स या गाण्यावर अफलातून डान्स...
X

नव वधूचा 'पप्पू कॅन्ट डान्स' या गाण्यावर जोरदार डान्स; व्हिडीओ व्हायरल

The bride dances to the song 'Pappu Cant Dance'; The video went viral

मुंबई // सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच पद्धतीने एका नव्या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकुळ घालत आहे. ज्यात एक नव वधू तिच्या मैत्रींसोबत नाचताना दिसत आहे. 'जाने तू या जाने' ना चित्रपटातील 'पप्पू कॅन्ट डान्स' या गाण्यावर ही नव वधू नाचताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळत आहे.

व्हिडिओमध्ये नाचणाऱ्या नव वधूचे नाव कोमल कपूर आहे. नृत्य नृत्यदिग्दर्शक महिमा यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे. जेनेलिया डिसूझा आणि इम्रान खान यांच्यावर हे मूळ गाणे चित्रित करण्यात आले आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देसी वधू हसताना दिसत आहे.

या व्हिडिओंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले आहे की 'वधू खूप सुंदर आणि अतिशय हसमुख आहे' तर दुसऱ्या यूजरने , 'प्रत्येकाची अशी मैत्री असावी' अशी कमेंट केली आहे.


Updated : 17 Oct 2021 5:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top