Home > News > तोल गेला अन् ' ती' ट्रेनखाली अडकली; ठाणे रेल्वेस्थानकावरील थरारक घटना

तोल गेला अन् ' ती' ट्रेनखाली अडकली; ठाणे रेल्वेस्थानकावरील थरारक घटना

तोल गेला अन्  ती ट्रेनखाली अडकली; ठाणे रेल्वेस्थानकावरील थरारक घटना
X

मुंबईची लाईफलाईन समल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणे कठीण होते. अनेक लोक ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतात. यातच काल झालेल्या वादळी पावसामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली. तर अशा परिस्ठितीत रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी धडपड सुरु केली.

तसेच काल मुंबई व आसपासच्या भागात पाऊस पडला तर मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल ट्रेन ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे ठाणे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत गेली. तर परवाशांना प्रवास करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गर्दी इतकी प्रचंड वाढली, की लोकांना ट्रेन मध्ये चढणे तर सोडा आत चढल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठी देखील जागा नव्हती. यातच हा भयभित करणारा सर्व प्रकार ठाण्यामध्ये घडला.


याचवेळी मध्यरेल्वेच्या ठाणे रेल्वेस्थानकावर एक थरारक घटना घडली.ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड सुरु होती. याचवेळी एक महिला डब्याजवळ एक महीला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेनखाली अडकली. तिथे इतकी प्रचंड गर्दी होती की, त्या महिलेला बाहेर पडणे देखील अवघड झाले होते, जीव वाचण्यासाठी तिची धडपड सुरु होती. तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरु होता. त्या नंतर जे काही घडलं ते अतिशय चित्त थरारक होतं या घटनेचा व्हिडिओ स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कॅद झाला आहे. जो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

Updated : 14 May 2024 9:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top