Home > News > मुंबई हादरली! महिलेच्या गुप्तांगात आरोपीने रॉड घातला

मुंबई हादरली! महिलेच्या गुप्तांगात आरोपीने रॉड घातला

मुंबई हादरली! महिलेच्या गुप्तांगात आरोपीने रॉड घातला
X

राजधानी मुंबईत एका महिलेसोबत 'निर्भया'सारख्या मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय महिलेच्या गुप्तांगात आरोपीने रॉड घातल्याचा संशय आहे. तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या गुप्तांगात दुखापत झाली असून आरोपीने रॉड घातल्याचा संशय आहे. सध्या या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, परंतु प्रकृती अजूनही गंभीर आहे.

या प्रकरणात, पोलिसांनी संबंधित अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आतापर्यंत एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे. ZEE NEWS HINDI ने आपल्या वेबसाईटवर ही बातमी दिली आहे.

Updated : 10 Sep 2021 12:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top