Home > News > चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर अत्याचार ; नराधमाला तिहेरी जन्मठेप

चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर अत्याचार ; नराधमाला तिहेरी जन्मठेप

चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर अत्याचार ; नराधमाला तिहेरी जन्मठेप
X

चॉकलेटचे आमिष देऊन सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर आरोपी नराधमाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यवतमाळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ह. ल मनवर यांच्या न्यायालयाने आज या प्रकरणाचा निकाल दिला आहे.

संजय उर्फ मुख्या मोहन जाधव (वय 24) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयीन सूत्रांच्या माहितीनुसार, 13 मार्च 2022 रोजी आरोपीने एका 6 वर्षीय चिमुकलीला घरात बोलवून चॉकलेटचे आमिष दिले. त्यानंतर तीचेवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर नराधमाने पीडित बालिकेला पाच रुपये देऊन कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. पीडित बलिकेची आई कामावरून परत आली तेव्हा ही घटना तिच्या लक्षात आली. त्यानंतर पीडित बलिकेने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आर्णी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.सदर प्रकरण दोन महिन्यानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आले. दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश मनवर यांनी सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीस तिहेरी जन्मठेप व 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासात आदित्य मिलखेलकर साहेब उपविभागीय अधिकारी दारव्हा यांनी अवघ्या दहा दिवसात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात न्यायालयाने एकूण दहा साक्षीदार तपासले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्रीमती नीती दवे व सहाय्यक सरकारी वकील अंकुश देशमुखयांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. या गुन्ह्याची तपास कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिलखेलकर, ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे, रायटर दोडके,बीट अंमलदार सतीश चौधर, मंगेश जगताप यांनी पार पडली.

Updated : 13 May 2022 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top