Home > News > गुजरातमध्ये २३ वर्षीय महिलेला निर्वस्र करून गावभर फिरवलं; पोलिसात गुन्हा दाखल

गुजरातमध्ये २३ वर्षीय महिलेला निर्वस्र करून गावभर फिरवलं; पोलिसात गुन्हा दाखल

गुजरातमध्ये २३ वर्षीय महिलेला निर्वस्र करून गावभर फिरवलं; पोलिसात गुन्हा दाखल
X

पत्नीचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा करत तिच्याच पतीनं गावकऱ्यांसोबत मिळून आपल्या पत्नीला निर्वस्र करून गावभर फिरवल्याची संतापजनक घटना गुजरात मधील दाहोद समोर आली आहे. ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धानपूर तालुक्यातील खजुरी गावात एका 23 वर्षांच्या आदिवासी महिलेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत पती आणि ग्रामस्थांनी तिला शिक्षा म्हणून आधी पतीला खांद्यावर घेऊन गावात फेरी मारायला लावली. नंतर तिच्या अंगावरील कपडे फाडून फेकले आणि तिला निर्वस्र करून गावभर फिरवले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ही घटना ६ जुलैची आहे. महिला स्वता:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती,मदत मागत होती, पण उपस्थितीत लोकांपैकी कुणीच तिच्या मदतीला आला नाही. याप्रकरणी पोलिसांनी पिडीत महिलेच्या पतीसह 18 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 15 July 2021 8:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top