Home > News > #KetakiChitale; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

#KetakiChitale; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

#KetakiChitale; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अश्वाघ्य पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला आज अखेर ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला होता. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.

अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती. नुकतंच शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यानंतर त्यावरुन भाजपकडून टीका झाली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीनं ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. केतकीने ही कविता शेअर केल्यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळवा, मुंबईसह इतर ठिकाणी केतकी विरोधात तक्रारी दाखल केल्यात. राज ठाकरेंनी या टिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Updated : 14 May 2022 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top