Home > News > ठाकरे की शिंदे कुणाचा फोटो लावायचा यावरून रंगले राजकारण..

ठाकरे की शिंदे कुणाचा फोटो लावायचा यावरून रंगले राजकारण..

ठाकरे की शिंदे कुणाचा फोटो लावायचा यावरून रंगले राजकारण..
X

दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आपापसात भिडले होते. राज्यात इतर ठिकाणी देखील या दोन्ही गटात जोरदार फोटोकारण सुरू आहे. आता कल्याण मध्ये देखील फोटो कारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण शहर शाखेने नव्याने फलक लावला. या बॅनर वर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे ,यांचे फोटो लावण्यात आले आहेत .तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयातून एकनाथ शिंदे यांचा फोटो काढण्यात आला आहे .याबाबत युनियन चे संस्थापक अध्यक्ष बाळ हरदास यांनी जेव्हा शिंदे यांना नेते पदावरुन हटविण्यात आले होते. त्याचवेळी त्यांचा फोटो काढला होता. याला बरेच दिवस उलटून गेले आहे.मात्र याबाबत त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.

तर म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयातून एकनाथ शिंदे यांचा फोटो काढल्याबाबत शिंदे गटाला समर्थन देणारे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्यात अन्य ठिकाणी फोटो काढण्यावरुन उद्रेक सुरु आहे. आता या ठीकाणी उद्रेक होऊ नये यासाठी युनियनच्या कार्यालयात एकनाथ शिंदे यांचा फोटो पुन्हा लावण्यात यावा यासाठी मी आग्रह धरणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.Updated : 5 Aug 2022 5:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top