Home > News > तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
X

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार घेत मोठा बंड केला. त्या नंतर शिवसेनेला खिंडार पडले शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाले. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार देखील कोसळले त्यामुळे शिवसेनेची अवस्था खिळखिळीत झाली आहे. परंतू अशातच शिवसैनिकांनी ठाकरे यांना मोठ्याप्रमाणात पाठिंबा दिला आहे. शिंदे गटा विरोधात शिवसैनिक आक्रमक देखील झाले होते. लोकांनी सामाजमाध्यमांवरून त्यानां जाहीर पाठिंबा दिला आहे. दरम्यान तेजस ठाकरे हे पक्षाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेणार का यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

युवासेना अध्यक्ष, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना बांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तथा उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय होऊ शकतात असे म्हटले जात आहे. दरम्यान, तेजस ठाकरे खरंच राजकारणात येणार का? या प्रश्नाचे आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. तेजस ठाकरे राजकारणात येणार नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

तेजस ठाकरे राजकारणात येणार ही चर्चा बातम्यांमधूनच केली जात आहे. या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला यायचे असेल तर तो सांगेन. कोणीतरी अफवा पसरवतं आणि याच अफवेला पुढे नेलं जातं. हे चुकीचं आहे," असे आदित्य ठाकरे यांनी त्यांच मत व्यक्त केल. आदित्य ठाकरे यांच्या उत्तरामुळे तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियते विषयीच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम लागला आहे.

Updated : 6 Aug 2022 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top