Home > News > बीडमध्ये तहसिलदाराची तीन महिलांवर दादागिरी, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बीडमध्ये तहसिलदाराची तीन महिलांवर दादागिरी, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बीडमध्ये तहसिलदाराची तीन महिलांवर दादागिरी, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
X

बीडमध्ये घरातील कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांनी धमकावले. त्यांच्या सह सात ते आठ अनोळखी व्यक्तींवर याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या तिन्ही फिर्यादी महिला गेवराईच्या समृद्धी नगर भागातील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी विनापरवाना जाऊन तुम्ही वाळु प्रकरणातील आरोपी लपवुन ठेवले आहेत असे म्हणत धमकवल्याचे या महिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अगोदरच गेवराई मधील अवैध वाळु उपशाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता वाळु चा वाद घरापर्यंत गेला असल्याचे दिसून येते. फिर्यादीत सांगितल्या प्रमाणे तहसीलदार सचिन खाडेंसोबत आणखी सहा ते सात लोक कोण होते ते पोलीस तपासात स्पष्ट होईल. तर या सर्व प्रकरणी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. याशिवाय महिलांवर अन्याय होत असेल तर आरोपीवर कारवाई होणारच मग तो कोणीही असो अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण यांनी दिली आहे.

Updated : 20 Feb 2022 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top