Home > News > रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला बलात्कार...

रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला बलात्कार...

परीक्षेत नापास करेन, धमकी देत शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला बलात्कार...
X

शिक्षक हे नेहेमी विद्यार्थ्यांच्या श्रद्धास्थानी असतात. मात्र रायगड जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गशिक्षकाने तिला नापास करण्याची धमकी देत तिचं शारिरीक शोषण केलं आहे. या संबंधित या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना ही रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील असून नराधम शिक्षकाचे नाव मदन वानखेडे असल्याचं कळलं आहे. मदन हा माणगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. तर ज्या मुलीवर अत्याच्यार झाला आहे, त्या मुलीची आईही याच शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मदन हा या अल्पवयीन मुलीवर नापास करायची धमकी देऊन २०१६ पासून शारिरीक अत्याचार करत होता. तसंच या मुलीला मी तुझ्या आईची नोकरी घालवेन अशी धमकी ही देत होता.

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल...

अलिकडे या मदनने या मुलीवर अत्याचाराचा कळस गाठला. अखेर या मुलीचा संयम सुटला आणि तिने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीकडून ही बातमी कळताच तिच्या आईने माणगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोस्को कायद्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करत नराधम मदन वानखेडेला अटक केली आहे. मदनने पिडित मुलीच्या नावे फेक इंस्टाग्राम खातं सुरू करून लोकांना आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.

Updated : 6 Jan 2021 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top