Latest News
Home > News > पत्नीला विकून खरेदी केला महागडा स्मार्टफोन; दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

पत्नीला विकून खरेदी केला महागडा स्मार्टफोन; दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

पत्नीला विकून खरेदी केला महागडा स्मार्टफोन;  दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
X

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर 55 वर्षीय व्यक्तीला स्वता:च्या पत्नीला 1 लाख 80 हजार रुपयांना विकल्याच्या आरोपावरून 17 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण हा ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

बेलपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी बुलू मुंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून 24 वर्षीय मुलीच्या संपर्कात आला आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यानंतर दोघांचे कुटुंब पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यास तयार झाले. मात्र लग्नाच्या बरोबर दोन महिन्यांनी, आरोपीने आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने दोन पैसे कमवण्याचे सांगून पत्नीला रायपूरला एका वीटभट्टीवर काम करण्यासाठी जायचं असल्याच सांगत राजस्थानातील एका गावात घेऊन गेला.

त्यांनतर त्याने आपल्या पत्नीला एका 55 वर्षीय व्यक्तीला 1 लाख 80 हजारात विकून टाकले. पत्नीला विकल्यानंतर आरोपीने खाण्या-पिण्यावर बराच खर्च केला आणि त्या पैशातून महागडा स्मार्टफोनही विकत घेतला. त्यांनतर मुलीच्या वडीलांना ओडिशामध्ये असलेल्या घरी बोलावून तुमची मुलगी कुणासोबत तरी पळून गेल्याचा आरोप केला. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी विश्वास बसला नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी तरुणाचा जवाब नोंदवला असतांना त्यांना काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला, त्यामुळे त्यांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता, आपणच आपल्या पत्नीला विकल्याची त्याने कबुली दिले. त्यांनतर लगेचच मुलीच्या सुटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

Updated : 23 Oct 2021 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top