Home > News > चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांचे गैर कृत्य

चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांचे गैर कृत्य

शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींवर शिक्षकांकडून होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांचे गैर कृत्य
X

बीड शहरातील नामांकित गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. प्रत्यक्ष पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून शिक्षका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी शाळा व्यवस्थापन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शाहेदखान कासम पठाण असं या शिक्षकाचे नाव आहे. या सर्व प्रकारानंतर आम्ही कोणाच्या भरोशावर मुलींना शाळेत पाठवायचं असा संतप्त सवाल देखील उपस्थित करत लाखों रुपयाची ट्यूशन फीस विद्यार्थ्यांकडून घेणारे संस्थाचालक मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजना बाबतीत मात्र हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ज्या चौथीच्या वर्गामध्ये या मुलीवर अत्याचार झाला त्या वर्ग खोलीत सिसीटीव्ही नव्हते. त्यामुळे नराधम शिक्षकावर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या संस्थेवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींवर शिक्षकांकडून होणाऱ्या अत्याचारात वाढ..

शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींवर शिक्षकांकडून होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे कारण मागच्या दोन आठवड्यात महाराष्ट्रातील हे दुसरे प्रकरण आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालूक्यातील लोटेवाडी गावच्या विद्या मंदिर लोटेवाडी या प्राथमिक शाळेतील महादेव हाळवणकर पाचवडे या शिक्षकाने ६ वी च्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर शिक्षकाला गावकऱ्यांनी शाळेमध्ये २ तास डांबून ठेवले होते. यानंतर ग्रामस्थांनी या नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला होता. व पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

Updated : 10 April 2022 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top