Home > News > मार्क वाढवून देतो म्हणत शिक्षकांने केली विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी; पुण्यातील संतापजनक प्रकार

मार्क वाढवून देतो म्हणत शिक्षकांने केली विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी; पुण्यातील संतापजनक प्रकार

मार्क वाढवून देतो म्हणत शिक्षकांने केली विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी; पुण्यातील संतापजनक प्रकार
X

11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला 12वी मध्ये मार्क वाढवून देतो असं सांगत शरीरसुखाची मागणी केल्याचा घृणास्पद प्रकार पुण्यात समोर आला आहे. मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना सांगताच त्यांनी संबंधित शिक्षकाला काळं फासून, त्याला चांगलाच चोप दिला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली असून, कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबधित शिक्षक 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील भाषेचा वापर करत होता. तसंच 12वी मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिक्षणाच माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात हा प्रकार घडल्यामुळे सर्व स्तरातून त्या शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

राज्यातील विकृती टोकाला गेली असून, अशा घटनांची राज्यात मालिकाच सुरु आहे. मात्र सत्तेत असलेल्या नेते अंतर्गत भांडणात व्यस्त असल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.Updated : 14 July 2021 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top