Home > News > नाहूर रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांची TC ला मारहाण

नाहूर रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांची TC ला मारहाण

नाहूर रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांची TC ला मारहाण
X

मध्य रेल्वेच्या नाहूर रेल्वे स्थानकात TC ला संतप्त महिला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Covid-19 मुळे प्रवाशांच्या सरसकट लोकल प्रवासाला बंदी आहे. पण तरीही अनेकदा प्रवासी रिस्क घेऊन लोकल प्रवास करत असतात. अशाच एका प्रवाशाला तिकीट निरीक्षकाने(TC)ने नाहूर स्थानकात अडवले. TC पासून वाचण्याच्या नादात प्रवाशाने नाहूर स्थानकातील पादचारी पूलावरून उडी मारली. याप्रकाराला संतापून स्थानकातील प्रवाशांनी TC ला एकच घेराव घातला आणि त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून त्यात महिला प्रवाशी TC ला मारहाण करताना दिसत आहेत.

प्रवाशांचा असा आरोप आहे की TC तिकीट तपासत असताना एका प्रवाशाचा पाठलाग करत होता. आपल्याकडे तिकीट नसल्यामुळे या प्रवाशाने थेट पादचारी पुलावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन त्यांनी थेट तिकीट घरामध्ये घुसून TC ला खेचून बाहेर काढले आणि त्याला बेदम मारहाण केली.

Updated : 2 Nov 2021 8:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top