Home > News > "मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात"

"मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात"

मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात
X

धर्माबाबत विवादित वक्तव्य आणि आपल्या बंडखोर लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका तस्लीमा नसरीन आपल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. बांगलादेशातील मशिदी-मदरशांमध्ये दररोज बलात्कार होत असल्याचा आरोप तस्लीमा नसरीन यांनी केला आहे. तस्लीमा नसरीन यांनी ट्विटरवरुन बांगलादेशातील मशिदी-मदरशांवर ताशेरे ओढले आहेत.

तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "बांगलादेशमध्ये जवळपास दररोज इमाम आणि मदरसा शिक्षक मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार करतात. अल्लाहच्या नावाने ते बलात्कार करतात. अल्लाह दयाळू आहे हे त्यांना माहिती आहे. यामुळे दिवसातून पाच वेळ नमाज पठण केलं तर अल्लाह केलेलं पाप माफ करेल". तस्लिमा नसरीन यांनी यावेळी फेसबुक पोस्टची लिंकही ट्विटमध्ये शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.


Updated : 10 Dec 2020 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top