Home > News > मुलांना सांभाळा; आरोग्य मंत्रालयानं दिला इशारा

मुलांना सांभाळा; आरोग्य मंत्रालयानं दिला इशारा

मुलांना सांभाळा; आरोग्य मंत्रालयानं दिला इशारा
X

नवी दिल्ली: तिसऱ्या लाटेत लहान मुलांना (Small children) अधिक धोका असल्याचा दावा अनेक अभ्यासकांनी केला असताना, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुद्धा लहान मुलांन (Small children) बाबतीत इशारा दिला आहे. मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुलांना (Small children) कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. तसंच देशातल्या बऱ्याच जिल्ह्यात कोविड 19 (Covid 19) रुग्णांच्या आकड्यात झालेल्या वाढीवर चिंताही व्यक्त केली आहे.

आरोग्य मंत्रालयाची देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर पत्रकार परिषद पार पडली. ज्यात लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचं, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले. त्यामुळे पुढील काळात लहान मुलांची काळजी घेण महत्वाचे असणार आहे.

गेल्या 24 तासांत देशात 38 हजार 949 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यात सर्वाधिक केरळमध्ये 13 हजार 773 नवीन प्रकरणे आढळली आहेत. तर महाराष्ट्रात 8,010 आणि तामिळनाडूमध्ये 2,405 नवीन रुग्ण समोर आले आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत 542 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 17 July 2021 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top