Home > News > ताई-दादा एकाच मंचावर पण बोलणं टाळलं... काय म्हणाल्या? सुप्रिया सुळे

ताई-दादा एकाच मंचावर पण बोलणं टाळलं... काय म्हणाल्या? सुप्रिया सुळे

"कदाचित घाई गडबड असेल, त्यांनाही एयरपोर्टच्या उद्घाटणाला जायचंय"

ताई-दादा एकाच मंचावर पण बोलणं टाळलं... काय म्हणाल्या? सुप्रिया सुळे
X

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर कधी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित राहिले आहेत. तसेच सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे देखील एकाच एकाच मंचावर अनेक वेळा दिसले आहेत. एकाच मंचावर आल्यावर ही पवार कुटुंबाचे एकमेकाना न बोलणे आणि एकमेकांकडे पाठ फिरविणे हे चांगलेच चर्चेचे विषय बनले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर उपस्थित होते. पुण्यातील रुग्णालयाच्या भूमीपूजनाच्या सोहळ्यानिमित्त ते दोघेही एकाच मंचावर होते. यावेळी त्यांनी भाषणात एकमेकांची नावं घेतली पण त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळल्याच चित्र पुढे आलं आहे.

३ मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पवार कुटुंब बारामतीमध्ये एकाच मंचावर होते. मात्र सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी बोलणं काय पाहणं सुद्धा टाळलं होतं. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पाठीमागे जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, पण अजित पवार यांना बोलणं टाळल होतं. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दुरावा फक्त बारामतीकरांनी अनुभवला असं नाही.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील दुरावा आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर असताना त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं आहे. पुण्यातील रुग्णालयाच्या भूमीपूजनाच्या सोहळ्यानिमित्त ते दोघेही एकाच मंचावर होते. यावेळी त्यांनी भाषणात एकमेकांची नावं घेतली पण त्यांनी एकमेकांशी बोलणं मात्र टाळल्याचे पाहायला मिळाले. तर मिडीयाच्या माध्यमातून ताई-दादाचा हा दुरावा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता.

दरम्यान, आजच्या कार्यक्रमातील अबोल्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या "संधीच मिळाली नाही ओ... ते गेले आणि त्यांना जायची घाई होती. आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर, मी तर आधीच वेळेवर येऊन बसले होते. देवेंद्रजी अगोदर आले, म्हणून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्याची वेळ मिळाली. दादा उशिरा आले आणि त्यांनाच पुढे जायला उशीर झाला. कदाचित घाई गडबड असेल, त्यांनाही एयरपोर्टच्या उद्घाटणाला जायचंय" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

Updated : 10 March 2024 9:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top