Home > News > स्वरा भास्कर तिच्या लग्नानंतर चर्चेत..

स्वरा भास्कर तिच्या लग्नानंतर चर्चेत..

स्वरा भास्कर तिच्या लग्नानंतर चर्चेत..
X

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीने 6 जानेवारी रोजी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले. आता 16 फेब्रुवारीला स्वराने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाची माहिती दिली आहे. दरम्यान, या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये ती कोर्ट मॅरेजनंतर डान्स करताना दिसत आहे. वास्तविक, हा व्हिडिओ स्वरा आणि फहादच्या मित्राने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.








कोर्टाबाहेर ढोलताशावर दोघांनी धरला ठेका..

या व्हिडिओमध्ये स्वरा आणि फहाद लग्नानंतर कोर्टातून बाहेर पडताना दिसत होते. यादरम्यान अभिनेत्री तिच्या पतीचा हात धरून खूप आनंदी दिसत आहे. लाल साडी, कपाळावर टिका आणि हातात मेंदी घातलेली स्वरा खूपच सुंदर दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.





Updated : 19 Feb 2023 9:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top