Home > News > सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट!

सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट!

विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही सुप्रिया सुळेंचं हे भाषण शांततेने ऐकून भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट केला आहे व सुप्रिया सुळे यांच कौतुक केलं.

सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट!
X

सतराव्या लोकसभेच अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका भावुक भाषणाने सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही सुप्रिया सुळेंचं हे भाषण शांततेने ऐकून भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट केला आहे व सुप्रिया सुळे यांच कौतुक केलं.

विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही सुप्रिया सुळेंचं हे भाषण शांततेने ऐकून भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट केला आहे व सुप्रिया सुळे यांच कौतुक केलं.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय, त्यांनी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. पण गेल्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवर भाष्य करताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या.सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट!सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट!सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट!सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट!व सुप्रिया सुळेंचं भावुक भाषण: भाजप खासदारांनी केला टाळ्यांचा कडकडाट! दोन वर्षे कोविडमुळे गेले आणि त्यात सर्वांचंच नुकसान झालं असल्याचं म्हटलं.

गेल्या पाच वर्षांत अनेक नवीन मित्र लाभले असून विरोधकांशी अनेक वादही झाल्याची सुप्रिया सुळे यांनी आठवण काढली. "कधी आम्ही तुमच्यावर नाराज, तर कधी तुम्ही आमच्यावर नाराज, असं सगळं घडलं," असं म्हणत त्यांनी विनोदही केला.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात जुन्या आणि नवीन संसदेच्या इमारतीतील आठवणीही ताज्या केल्या. "आपली बॅच अशी असेल ज्यांनी दोन्ही संसदेत काम केलं आहे. संसदेच्या जु्न्या इमारतीत अनेक आठवणी आहेत. देश ७० वर्षात जसा उभा राहिला, त्यात योगदान असलेल्या अनेक दिग्गजांच्या त्या इमारतीत आठवणी आहेत," असं त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेतील सर्व नागरिकांचे आभार मानले ज्यांनी मला इथे निवडून पाठवलं. राजकीय लढाई सुरुच राहील, मात्र आपल्या वैयक्तिक संबंधात कटुता येऊ नये हीच अपेक्षा करते. हीच लोकशाहीची ओळख आहे. देशाच्या विकासात सर्वांनी एकत्र काम करायला हवं. सगळ्यांचे मी पुन्हा आभार मानते," असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आपलं भाषण संपवलं.

सुप्रिया सुळेंचं भाषण संपल्यानंतर सर्व खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं कौतुक केलं. विरोधकांसह भाजप खासदारांनीही सुप्रिया सुळेंच्या भाषणावर टाळ्या वाजवून दाद दिली.

सुप्रिया सुळेंच्या भावुक आणि दमदार भाषणाने सभागृहातील वातावरण एका क्षणासाठी भारलेलं होतं. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीही टाळ्यांचा कडकडाट करून सुप्रिया सुळेंच्या भाषणाचं कौतुक केलं. हेच सुप्रिया सुळेंच्या वक्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वाचं यश आहे असं समाज माध्यमात म्हटल जात आहे

Updated : 11 Feb 2024 10:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top