Home > News > 'माझी लेक रेवती आता नोकरी करते'; सुप्रिया सुळे याचं भावूक ट्विट...

'माझी लेक रेवती आता नोकरी करते'; सुप्रिया सुळे याचं भावूक ट्विट...

माझी लेक रेवती आता नोकरी करते; सुप्रिया सुळे याचं भावूक ट्विट...
X

मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (30 रोजी) आपला वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसोबत साधेपणाने साजरा साजरा केला. विशेष म्हणजे यावेळी वाढदिवसासाठी केक सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिने आपल्या कामाच्या पैशातून आणला होता. सुप्रिया सुळे ट्विटरवरुन ही माहिती देतांना भावूक झाल्या.

सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केल्याचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. खुद्द सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ही फोटो शेअर केले आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनी केकचा स्वतंत्रपणे फोटो शेअर करत भावूक झाल्या.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, 'हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट... कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं', अशा भावनिक शब्दात सुप्रिया सुळेंनी आपला आनंद शेअर केला आहे.

सोबतच सुप्रिया सुळे यांनी आपले वडील शरद पवार आणि आपल्या आईचा फोटो सुद्धा पोस्ट करत, आई-बाबा आणि कुटुंबीयांच्या सोबतीने वाढदिवसाचा हा क्षण साजरा केला. हे क्षण अनमोल असल्याचं म्हंटल आहे.

Updated : 1 July 2021 11:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top